श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १४

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १४
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय चौदावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          श्री स्वामी कृपेमुळेच या ग्रंथाचे तेरा अध्याय पुर्ण होऊ शकले. आता त्याच कृपेच्या बळावर हा चौदावा अध्याय वदवून घ्यावा. अशी विनंती,श्री स्वामींं चरणी करुन ग्रंथकार अध्यायाला प्रारंभ करतात. 
          श्री स्वामींची भक्ती कशी करावी असे प्रश्न अनेक भक्तजन ग्रंथकारांना करत असत. तेव्हा या अध्यायातून ग्रंथकाराने त्यांची उत्तरे दिली आहेत. व भक्तांच्या मनातील शंकांचे, समस्यांचे निरसन केले आहे. भक्ती, साधना व उपासना कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे. 
          सकाळी उठून आधी श्री स्वामींचे स्मरण करावे, त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटोपून आसनावर बसावे. श्री स्वामींची मनोभावे पुजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालावे, हिणा अत्तर लावून चंदनाचा लेप करावा. सुगंधी चाफ्याची फुले श्री स्वामींच्या आवडीची त्यामुळे ती वहावी. चाफ्याची फुले उपलब्ध नसतील तर कोणतीही फुले अर्पण करू शकता. 
     ‌‌ धुप, दिप, नैवेद्य आणि तांबूल वाहून श्री स्वामीं पुढे दक्षिणा ठेवावी. श्री स्वामींना नमस्कार करून नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य असल्यास श्री स्वामींची सहस्त्रनामावली उच्चारून विविध गुणविशेषणांनी व वैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याची भजने गावीत. 
          श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेऊन, आपल्या कुटुंबीयांचे व समाजाचे स्वास्थ्य उत्तम रहावे व सर्व कार्ये पुर्णत्वास यावी याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपोषण करावे. आणि प्रदोष समयी उपोषण सोडावे व श्री स्वामी पुजा करावे. त्यामुळे चित्त व बुद्धी सदऋष्ट होते. जपध्यान करावे तसेच मानस पुजाही श्री स्वामींना प्रिय आहे. 
          आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा कधीही अहंकार बाळगू नये. जे दांभिक भक्ती करतात त्यांवर श्री स्वामी समर्थ कसे बरे प्रसन्न होतील? जे भक्त शूद्ध चित्ताने व मनापासून भक्ती करतात तेच भक्त श्री स्वामींना प्रिय आहेत. 
           ग्रंथ कर्त्याने या अध्यायात श्री स्वामी सेवा कशी करावी याबद्दल सांगून ह्या चौदाव्या अध्यायाची समाप्ती केली आहे. 

                श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 

         





          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||


थोडे नवीन जरा जुने