श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १३

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १३
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय तेरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
           बाळप्पा हे श्री स्वामी सेवेत रूजू झाले. बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे सेवेकर्यांमधील अनेकजण नाराज होऊ लागले. श्रीपाद भटांनी तसेच अनेक सेवेकरांनी बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्यासाठी अनेक खटाटोपी केल्या. पण श्री स्वामी कृपेने त्या सर्व निष्फळ ठरल्या. या बद्दलचा वृत्तांत आपण मागील अध्यायात पाहीला. 
          बाळप्पा हे पुर्वीचे गृहस्थाश्रमीचे असल्या कारणाने, बाळप्पांना श्री स्वामी सेवेतील काही कामे करन्यास लज्जा वाटत असे. त्यामुळे श्री स्वामी सतत बाळप्पांनाच कामे सांगत. एकदा श्री स्वामींनी बाळप्पांना उपदेश केला 'नीर्लज्जेसी सानीध्य गुरौ'. म्हणजेच जो शिष्य आपल्या गुरूची कोणत्याही प्रकारची सेवा मनात लाज न बाळगता करतो, त्याला सदैव गुरूची साथ मिळते. आणि बाळप्पा पुढे निःसंकोचपणे श्री स्वामी सेवा करू लागले. 
          बाळप्पांचा हा समर्पन भाव सुंदरा बाईंना आणि काही सेवेकर्यांना जाचक वाटत असे. एका मध्य रात्री श्री स्वामींनी लघुशंका लागली म्हणून इतर कोणाला न उठवता बाळप्पांना उठवले त्यामुळे बाळप्पा विषयीचा द्वेष सुंदरा बाईंच्या मनात आणखी वाढला. कानामागून आला आणि तिखट झाला असे विचार सुंदरा बाई करू लागल्या.
          कोण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. सना निमित्त तो चंद्रहार श्री स्वामींना घालावा असा विचार राणीसाहेबांच्या मनात आला. तो चंद्रहार घेण्यासाठी राणीसाहेबांनी एका शिपायाला बाळप्पांकडे पाठवले. पण बाळप्पांनी त्या चंद्रहारावर चोळप्पांची जबाबदारी सांगून, चंद्रहार देण्यास नकार दिला. आणि त्यावेळी चोळप्पा मठात रहात नसल्या कारणाने आमची जबाबदारी नाही असे सांगून नकार दिला.
          शिपायाने राजवाड्यात परतून राणीसाहेबांना घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळी राणीचा सुंदरा बाईंवर खुप विश्वास होता. सुंदरा बाईंनी चोळप्पांन विषयी राणीसाहेबांचे कान फुंकले. व चोळप्पांना मिळणारा मेहेनताना राणीसाहेबांकरवी बंद करण्याचा प्रयत्न केला पण श्री स्वामी कृपेने तो प्रयत्न निष्फळ ठरला.  
          बाळप्पां विषयीही सुंदरा बाई श्री स्वामीं जवळ कागाळ्या करू लागल्या. तेव्हा श्री स्वामींनी बाळप्पांना मारूतीच्या मंदिरात बसून नामस्मरण करण्यास सांगितले. पुढे श्री स्वामींनी सुंदरा बाईंनाही आपल्यापासून दूर केले. आणि सुंदरा बाईंची कारकीर्द संपुष्टात आली. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या तेराव्या अध्यायाची समाप्ती होते. 

                श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 

         



         थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना 
 श्री स्वामी समर्थ||














थोडे नवीन जरा जुने