श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ५

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय  ५
          श्री स्वामी समर्थ, आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पाचवा याबद्दल जाणून घेणार आहोत. 
         अध्यायाला सुरूवात करताना ग्रंथकाराने, जर सत्पुरुषांचा सहवास लाभला तर भक्तांमध्ये उत्तम बदल घडून येतात असे विधान केले आहे. ज्यांची पुर्व पुण्याई आहे त्यांनाच श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या मालोजी राजांना ही पुर्व पुण्याई मुळेच श्री स्वामीं सारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास लाभला. 
          श्री स्वामींची किर्ती पुर्ण भारतभर पसरली होती. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर पोहोचली. मल्हारराव गायकवाडांच्या मनात विचार आला की, आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोद्यास घेऊन यावे. या करिता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण तसेच सरदारां समोर, जो कोणी श्री स्वामींना बडोद्यास घेऊन येईल त्याला आम्ही इनाम आणि जहागीरी देऊन, मानसन्मान देऊ, असा प्रस्ताव ठेवला. 
          हे ऐकून जाणत्या मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. अक्कलकोटास निघताना तात्यासाहेबांनी मल्हाररावांकडून बरेचसे धन आणि बराचसा सेवकांचा तांडा घेतला, आणि तात्यासाहेब अक्कलकोटास पोहोचले. श्री स्वामींना खुष करण्यासाठी तात्यासाहेबांनी याचकांना धन द्रव्य दिले. तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. तात्यासाहेबांनी चोळप्पाला गाठून दहा हजारांची जहागीरी देण्याचे आमिष ही लावले. चोळप्पांना त्यावेळी धनाची चणचण भासत होती. त्यामुळे चोळप्पांला धनाची आशा लागली.
          चोळप्पानी हा विषय श्री स्वामींपाशी काढला. आणि आपण बडोद्यास गेल्यावर आपला योग्य सन्मान होईल असे सांगितले. तेव्हा श्री स्वामी हसले आणि म्हणाले, "अरे त्यांच्या मनात भक्तीच नाही, तिथे जाऊन काय उपयोग?" इथे कथेचा पुर्वार्ध संपविताना ग्रंथकाराने उत्तरार्धा विषयी सुतोवाच केलेला आहे. अशा रीतीने श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पाचवा समाप्त होतो. 
          श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

      
          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||




थोडे नवीन जरा जुने