श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय २१

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय २१

          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय एकवीसावा आणि शेवटचा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          पुढील अध्यायास प्रारंभ करताना ग्रंथकार म्हणतात. ज्या प्रमाणे एखाद्या देवालयाची निर्मिती होत असताना प्रथम चौक आणि बैठका आदिंची सिद्धता केली जाते. आणि अखेरीस कळसाची बांधनी केली जाते. तेव्हाच त्या देवालयाला खर्या अर्थाने पुर्णत्व प्राप्त होते. त्या प्रमाणेच या चरित्र ग्रंथाचा कळसाध्याय लिहिल्या शिवाय हे, श्री स्वामी चरीत्र सारामृत पुर्णत्वास जाणार नाही. त्यामुळे ग्रंथकार या शेवटच्या अध्यायाचे कथन भक्त जनांसाठी करत आहेत. आणि श्री स्वामी चरीत्र सारामृत कथन पुर्णत्वास नेण्यासाठी श्री स्वामींचरणी प्रार्थना करीत आहेत. 
          आता आपला‌ मानवी अवतार संपवावा, असे मनात आणून श्री स्वामींनी शके अठराशे पुर्ण, बहुधान्य संवत्सर, मास चैत्र, कृष्ण पक्ष, त्रयोदशीस मंगळवारी आणि चतुर्थ प्रहराच्या अवसरी चित्त एकाग्र करून आपले निर्वाण साधले. आणि निजरूपी निमग्न झाले. ब्रम्हरंध्राला छेदून हृदयामधून आत्म ज्योत निघून ती अवकाशात विलीन झाली. 
          जवळ असलेल्या सेवेकर्याना अपार दुःख झाले. ग्रंथकार म्हणतात, सेवेकर्यानी केलेल्या नाना प्रकारच्या शोकाचे वर्णन माझ्या कडून करणे मला फार कठीण जात आहे. जर त्या अक्रोशाचे सविस्तर वर्णन केले तर ह्या ग्रंथाचे लिखाण समुद्रा प्रमाणे पसरेल. 
          समाधीस्त होण्या आधी श्री स्वामींनी अनेक लीला करून जनांस सन्मार्गास लावले. त्यांचे वर्णन या ग्रंथामध्ये ग्रंथकाराने केले आहे. स्वतः विषयी माहिती देताना ग्रंथकार सांगतात, की त्यांचा जन्म हा कोकणातील पालशेत या गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात झाला. नोकरीच्या निमित्ताने त्यांना कोपरलीला यावे लागले. 
          तिथे त्यांचा परिचय शंकरशेट नावाच्या गृहस्थांशी झाला. शंकरशेट हे श्री स्वामींचे निस्सीम भक्त होते. शंकरशेट यांच्या सहवासातच ग्रंथकारांना श्री स्वामींची भक्ती जडली. आणि त्यांच्यामुळेच हा श्री स्वामी चरीत्र सारामृत ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. 
          या अध्यायाची समाप्ती करताना ग्रंथ कर्त्याने भक्त जनांसाठी अवतरणी दिली आहे ती पुढील प्रमाणे, 
          पहिल्या अध्यायात ग्रंथ कर्त्याने देवता स्तवन करून या अध्यायास कोण आधार आहेत याचे वर्णन केले आहे. दुसऱ्या अध्यायात श्री स्वामी कर्दळी वनात प्रकट झाले आणि भुवरी प्रख्यात झाले यांचे वर्णन केले आहे. तीसर्या अध्यायात भक्तजनांना तारण्यासाठी अक्कलकोट येथे प्रवेश केला आणि तेथील श्री स्वामी महिमेचे वर्णन केले आहे. 
          चौथ्या अध्यायात दोन दृष्ट संन्यासी श्री स्वामींच्या भेटीस आले त्यांचे समग्र वर्णन केले आहे. पाचव्या अध्यायात बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाडांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्यासाठी कारभारी पाठवले त्याची कथा आली आहे. सहाव्या अध्यायात यशवंतराव सरदाराला चमत्कार दाखविला त्याचे वर्णन केले आहे.
         सातव्या अध्यायात विष्णु बुवा ब्रम्हचारी यांची श्री स्वामी चरणी कशी श्रद्धा झाली याचे वर्णन केले आहे. आठव्या अध्यायात शंकर नावाच्या गृहस्थाची ब्रम्ह समंधाची बाधा दूर करुन दुःख मुक्त केले त्यांचे वर्णन केले आहे. नवव्या अध्यायात त्या गृहस्थांनी बराच पैसा खर्च करून श्री स्वामींचा मठ बांधला याचे वर्णन केले आहे. 
         दहाव्या अध्यायात चिदंबर दिक्षितांच्या कथेचे वर्णन केले आहे. अकरा, बारा, तेरा, आणि चौदाव्या अध्यायात श्री बाळप्पा यां बद्दलची कथा आणि त्यांच्या भक्ती मार्गाचे संपूर्ण वर्णन केले आहे.
         पंधराव्या अध्यायात बसप्पा नावाचा तेली कसा श्री स्वामी भक्त झाला याची गोड कथा वर्णीली आहे. 
          सोळा आणि सतराव्या अध्यायात हरीभाऊ मराठे कसे श्री स्वामींना भेटले आणि श्री स्वामी भक्त झाले याची कथा आली आहे. अठराव्या अध्यायात हरीभाऊ मराठे यांचा कणिष्ठ बंधु कसे भजनात रंगून श्री स्वामी भक्त झाले आणि दादा बुवा म्हणून प्रसिद्ध झाले याचे वर्णन केले आहे. 
          एकोणिसाव्या अध्यायात वासुदेव फडक्यांची आणि तात्यांची कथा सारांश रूपात आली आहे. विसाव्या अध्यायात एका निर्धन गृहस्थास धनलाभ होऊन त्याचा भाग्योदय कसा झाला याचे वर्णन केले आहे. एकविसाव्या अध्यायात या ग्रंथाच्या प्रयोजनेबद्दल आणि श्री स्वामी समाधीस्त झाले यांचे वर्णन केले आहे. 
          आपल्या मात्या पित्यास वंदन करून ग्रंथ समाप्ती करताना ग्रंथकार म्हणतात. जर हा ग्रंथ कोणी मनात भाव धरुन वाचेल किंवा श्रवण करेल त्यास आयुरारोग्य प्राप्त होईल, संपत्ती आणि संतति प्राप्त होईल, त्यांची किर्ती वाढून मुखात सदैव सरस्वतीचा वास असेल. भवसागरास तरोन मोक्षाची प्राप्ती होते. तो सर्वश्रेष्ठ भक्त बनून, विनयी बनतो. वृथाभिमान दुर होतो. असे कथन करुन ग्रंथकार या कळसाध्याय म्हणजेच एकविसाव्या अध्यायाची समाप्ती करतात. 
               श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

                   श्री स्वामी चरीत्र सारामृत संपुर्णम् ||

          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना 
 श्री स्वामी समर्थ||




थोडे नवीन जरा जुने