श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १०

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय  १०

          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय दहावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          आपल्या पुर्व पुण्याई मुळेच आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आणि आपल्या हातून हे श्री स्वामी चरीत्र सारामृताचे लिखाण होत आहे. या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार ‌पुढे कथा लिहिण्यास प्रारंभ करतात. 
          हावेरी नामक गावी बाळाप्पा नावाचे, सराफीचा व्यवसाय करणारे यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते. सुख, समृद्धी आणि धनधान्याला ‌घरात काही कमी नव्हती. सर्व प्रकारचे सुख त्यांना मिळत होते. वयाच्या तिशीला त्यांचे मन प्रपंचात लागेनासे झाले. आणि त्यांना परमार्थाची ओढ लागली. प्रपंच हा क्षणभंगूर आहे. त्यातील सुखाच्या मागे धावण्या पेक्षा, शाश्वत आणि मुक्तीदायक परमार्था कडे‌ वळण्याचा बाळप्पांनी निश्चय केला. 
          एका रात्री बाळप्पांना स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये अनुकूल संकेत मिळताच, त्यांनी सोलापूरास काही काम असल्याचे सांगून आपले घरदार सोडले. आणि सद्गुरूच्या शोधात इतरत्र भटकू लागले. 
          फिरत फिरत बाळप्पा मुरगोड गावी येऊन पोहोचले. मुरगोड येथे पुर्वी चिदंबर दिक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. 
           चिदंबर दिक्षितांचा परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की, मुरगोड गावी मल्हार दिक्षित नावाचे ईश्वरभक्त ब्राह्मण रहात होते. ते वेदशास्त्रसंपन्न होते. परंतु संतान सुख नसल्याने सदैव उदास रहात. संतान प्राप्ती व्हावी म्हणून मल्हार दिक्षितांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना शिव प्रसादामुळे पुत्र रत्नाचा लाभ झाला. 
          साक्षात श्री शंकराने मल्हार दिक्षितांच्या पत्नी पोटी जन्म घेतला. पुढे हे बालक सर्व प्रकारच्या विध्याभ्यासात निपूण झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्या बालकाने, मातीच्या हत्तीला जीवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दूर्व्यवहार करणार्या रावबाजी पेशवे यांचे राज्य पुढं लयास गेले. 
          या चिदंबर दिक्षितांच्या महायज्ञ समारंभात खुद्द श्री स्वामी हजर होते. आणि श्री स्वामींकडे तुप वाढण्याची जबाबदारी होती असे ग्रंथकार लिहितात. जेवणावळीत जेंव्हा तुप संपले तेव्हा श्री स्वामींनी रित्या कलशांना स्पर्श करून, चमत्काराने सर्वांना तुप पुरवले. असे ग्रंथकाराने कथन केले आहे. अशा या चिदंबर दिक्षितांच्या भुमित बाळप्पा दाखल झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या दहाव्या अध्यायाची समाप्ती होते.
             श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

         
         थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
थोडे नवीन जरा जुने