घराचा मुख्य दरवाजा कुठे असावा ?

घराचा मुख्य दरवाजा कुठे असावा ?

          आपल्याला नवीन घर शोधताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा कुठे असावा या बद्दल माहिती आसने खुप गरजेचे आहे. कारण या मार्गानेच आपल्या कुटुंबासाठी येण्याचा केवळ मार्ग नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठीही मार्ग आहे. 
          घराच्या प्रवेश द्वारा साठी उत्तर, उत्तर -पुर्व, पुर्व किंवा पश्चिम दिशा ही सर्वोत्तम आणि शुभ मानली जाते. यामुळे घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. घराचा मुख्य दरवाजा हा योग्य ठिकाणी आणि सुशोभित असेल घरात येणार्या प्रत्येक व्यक्ती वर पहिली छाप पडते तसेच त्या व्यक्ती सोबतची नकारात्मक उर्जा घराच्या बाहेर थांबते. 
         घरातील मुख्य दरवाजा हा बदलता येत नसल्यास, त्यामुळे झालेले दोष आपण काही उपाय करून घालवू शकतो. दरवाजा हा वायव्य किंवा आग्नेय दिशेला असल्यास, दरवाज्याच्या समोर आपण शीशे याधातुचे पिरामिड आणि हेलिक्स ठेवून दोष दूर करू शकतो. जर पिरामिड आणि हेलिक्स शीशे चे उपलब्ध नसल्यास पितळेचे ही वापरू शकतो. मुख्य दरवाजा हा घरातील इतर दरवाजां पेक्षा मोठा असावा. 

मुख्य दरवाजा साठी विशिष्ट दिशाच का चांगल्या आहेत?

१) ईशान्य - उत्तर -पुर्व दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते. सुर्योदयाच्या किरणांसोबत अफाट उर्जा घरात वाहू लागते. त्यामुळे कुटूंबातील सदस्या मध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य राहते. 
२) उत्तर - या दिशेने कुटुंबासाठी संपत्ती आणि शुभ वार्ता मिळते. 
३) पुर्व - या दिशेने कुटुंबासाठी शक्ती मिळते. आणि सदैव कुटुंबात उत्साह असतो. 

मुख्य दरवाजा साठी पर्याय

१) आग्नेय - कधीही नैऋत्य दिशेची निवड करू नका. त्यासाठी आग्नेय दिशेचा पर्याय उत्तम आहे.
२) वायव्य - कोणताही पर्याय नसल्यास वायव्य दिशेचा वापर आपण करू शकतो. संध्याकाळचा सुर्य प्रकाश आणि भरभराट या दिशेने होतो.

दरवाजा समोर काय असावे?

मुख्य दरवाजा वर नेहमी धातूची नावाची पाटी असावी. दरवाजा समोर नेहमीमुख्य दरवाजा वर नेहमी धातूची नावाची पाटी असावी. दरवाजा समोर नेहमी शुभ चिन्हांची रांगोळी काढावी. दरवाजात गणेश व लक्ष्मीच्या मुर्त्या ठेवून परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. शक्य असल्यास काचेच्या भांड्यांनी दरवाजा सुशोभित करावा. प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल ठोकावी. घराचा उंबरठा हा नेहमी लाकडी असावा. दरवाजात नेहमी पायपुसनी ठेवावी जेणेकरून घर स्वच्छ राहील व नकारात्मक उर्जा प्रवेश करणार नाही. दरवाजा समोर एखादे तुळशी चे रोप किंवा मनी प्लांट लावावे. शुभ चिन्हांची रांगोळी काढावी. दरवाजात गणेश व लक्ष्मीच्या मुर्त्या ठेवून परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. शक्य असल्यास काचेच्या भांड्यांनी दरवाजा सुशोभित करावा. प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल ठोकावी. घराचा उंबरठा हा नेहमी लाकडी असावा. दरवाजात नेहमी पायपुसनी ठेवावी जेणेकरून घर स्वच्छ राहील व नकारात्मक उर्जा प्रवेश करणार नाही. दरवाजा समोर एखादे तुळशी चे रोप किंवा मनी प्लांट लावावे.


कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

दरवाजा समोर कधी ही शु रैक ठेवू नये. मोडलेल्या वस्तू ठेवू नये. डस्ट बीन ठेवणं टाळावे. दरवाजा समोर कधी ही आरसा लावू नये. ज्यामुळे उर्जा प्रतिबिंबित होऊन घराच्या बाहेर पडत नाही. दरवाजा वर काळे रंग असलेले कोणतेही पेंटिंग लावू नये. प्रवेश द्वारावर लाल रंगाचे दिवे लावणे टाळावे. 

          घरात पुरेसा सुर्य प्रकाश येत असेल तर घरात ऊर्जा येऊन रोगराई नष्ट होते. दरवाजा समोरील परिसर हिरव्या रोपांनी सजवावे. घरात संपत्ती व समृद्धी येण्यासाठी प्रवेश द्वारावर एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात रंगीत फुले सजवावीत. दरवाजाची डोअर बेल कर्कश्श न ठेवता सौम्य आवाजाची निवडावी. दरवाजा कधीही काळ्या रंगाचा नसावा. दरवाजाला मन प्रफुल्लित करणारे रंग असावेत. दरवाजा समोर कधीही सेप्टिक टाक्या ठेवू नयेत. 
          तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रा नुसार आपणास सांगितल्या आहेत. यामुळे आपणास नक्कीच फायदा होईल अशी आशा बाळगतो. तर पुन्हा भेटू या आणखी काही नवीन टिप्स सोबत. तोपर्यंत आपला निरोप घेतो नमस्कार. 
थोडे नवीन जरा जुने