श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय २०

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय २०
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय विसावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          ग्रंथकाराने श्री गणेशाला वंदन करून कथन केले आहे की, मी तुमच्या (श्री स्वामी समर्थ) चरित्राचे कथन करण्याचा छंद जोपासला आहे. पण मला‌ हजारो जरी हात असते तरीही आपल्या संपूर्ण गुणांचे वर्णन, तुमच्या अनेक लीलांचे वर्णन, माझ्यासारखा मतिमंद काय ते करणार? तरीही श्री स्वामी कृपेने आजपर्यंत एकोणीस अध्याय पुर्ण झाले. आणि श्रोत्यांसाठी हा विसावा अध्याय कथन करणार आहे. ग्रंथकार पुढे म्हणतात या अध्यायाच्या श्रवणाने आणि कथन केल्याने मनुष्याचे सर्व दोश दहन होतात.श्रवण करणारा आणि कथन करणारा दोघेही पावन होतात. 
          अक्कलकोटात वास करून श्री स्वामींनी लोकांना अनेक लीला दाखविल्या. अनेक पाप्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार केला. असे हे श्री स्वामींचे अद्भुत चरित्र आहे. 
          एकेदिवशी एक सद्गृहस्थ मनात श्री स्वामींची दर्शनेच्छा घेऊन अक्कलकोटला आले. श्री स्वामीं जवळ येऊन त्यांनी श्रीं चे स्तुती गाण गायीले. आणि श्री स्वामींच्या चरणावर मस्तक ठेविले. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, मुक्त हस्ते फकिरांना अन्नदान कर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्या गृहस्थाने नाना तर्हेचे पक्वान्न बनवले आणि श्री स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून पाच फकिरांना जेऊ घातले. 
          ते फकीर जेऊन उठले आणि ताटात काही अन्न शेश राहीले. तेव्हा श्री स्वामींनी त्या गृहस्थास ते शेश अन्न ग्रहण करण्याची आज्ञा दिली. पण ते गृहस्थ श्रेष्ठ ब्राह्मण असल्यानं मनात संशय आला. जर हे यवनांचे उष्टे अन्न ग्रहण केले आणि माझ्या इतर माणसांना हे कळले तर स्वजनात माझी निंदा नालस्ती होईल. असा विचार त्या गृहस्थाच्या मनात येताच श्री स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले, तुझ्या मनात कींतू आला चल‌ चालथा हो इथून. असे बोलने ऐकून तो गृहस्थ खाली मान घालून निघून जातो. 
          तेव्हा कोणी एक भ्रमिष्ट गृहस्थ श्री स्वामींच्या समोर येऊन उभा राहितो. काही काम नसल्यामुळे आणि दारिद्र्याने ग्रासल्यामुळे भ्रमिष्ट होऊन रात्रंदिवस इतरत्र तो भटकत होता. तेव्हा श्री स्वामी त्या भ्रमिष्ट गृहस्थास आज्ञा करतात हे शेश अन्न ग्रहण कर तुझे सर्व मनोरथ पुर्ण होतील. धन प्राप्ती होईल. 
         मनात कोणतीही शंका न धरता त्या गृहस्थाने ते अन्न ग्रहण केले. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले तु त्वरित मुंबईला जा. तुला धन प्राप्ती होईल. तेव्हा तो मुंबईस आला आणि द्रव्य मिळेल म्हणून इतरत्र भटकू लागला. 
         पहाटे भटकत भटकत तो एका घरापाशी येऊन उभा राहतो. तेव्हा एक वृद्ध बाई घाईघाईने दार उघडून बाहेर येते. आणि त्या गृहस्थाला आसनावर बसवून भोजन करवते. भोजन झाल्यानंतर त्या वृद्ध बाईने त्या गृहस्थाला दहा हजार रूपये दक्षिणा दिली. द्रव्य लाभ पाहून तो भ्रमिष्ट गृहस्थ शुध्दीवर येतो. त्या गृहस्थाला श्री स्वामी वचनांची प्रचिती येते. व तो वारंवार श्री स्वामींच्या स्तुतींचे गायन करु लागतो. 
          अश्या श्री स्वामींच्या लीला माझ्या सारखा पामर कसा काय कथन करू शकेल. या श्री स्वामींच्या लीला भांडारातून काही रत्ने गोळा करून तुम्हाला कथन करीत आहे. ही स्तुती सुमने श्रोत्यांनी प्रेम भावनेने श्रवण करावी असे प्रतिपादन करून. या विसाव्या अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात.
          ‌‌ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||


          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना 
 श्री स्वामी समर्थ||
थोडे नवीन जरा जुने