श्रीपाद श्रीवल्लभ

श्रीपाद श्रीवल्लभ 
          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या दुसऱ्या अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ यांना श्री दत्त गुरुंचे दुसरे अवतार मानले जाते.    
          श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म पीटीकापुरम येथे झाला. ई. सन १३२० मध्ये. तो दिवस भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्दशीचा होता. त्या गावाला आज पिठापुर म्हणून ओळखलं जाते. जे आंध्रप्रदेशमध्ये आहे. त्यांच्या वडिलांचे नाव अप्पलराजा तर आईचे नाव सुमती शर्मा असे होते. त्या दांपत्याना दोन मुले आणि तीन मुली होत्या. 
          अप्पलराजा आणि सुमती शर्मा हे श्री दत्त गुरुंचे निस्सीम भक्त होते. त्यांचे दोन मुले अपंग होती. एक आंधळा तर दुसरा लंगडा होता. एकदा या कुटुंबाने दिवंगत कुटुंबीयांना श्रद्धांजली देण्यासाठी श्राद्धाचा कार्यक्रम केला. त्यासाठी अनेक ब्राह्मण व पाहुण्यांना आमंत्रित केले. व त्यांना आदरातिथ्याने आणि श्रद्धेने भोजन अर्पण केले. तिथे श्री दत्त ब्राह्मण वेशात भिक्षेसाठी आले. आणि त्या दांपत्याच्या भक्ती भावाला पाहून प्रसन्न झाले. व श्री दत्त रूपात त्यांना दर्शन दिले. प्रसन्न होऊन श्री दत्त गुरुंनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमती शर्मा ने वर मागितला की, तुम्ही मला सदैव आई म्हणून संबोधावे. तेव्हा श्री दत्त महाराजांनी त्यांच्या पोटी जन्म घेणार असल्याचे सांगितले. पण हा मुलगा फक्त सोळा वर्षे सोबत राहून पुढे संन्यास धारन करेल आणि जनकल्याणासाठी घरदार सोडून जगाचा गुरू होईल. असे सांगून ते अदृष्य झाले.
           श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी संन्यास घेतला आणि वयाच्या तीशीपर्यंत शारिरीक अवस्थेत वास्तव्य केले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी कुरवपूर येथे घालवले. आणि अनेक लीला करून जनांस सन्मार्गास लावले.
          पुढे त्यांनी कुरवपूर मधील कृष्णा नदीच्या किंवा कुरगुड्डी या नदीच्या बेटात ई. सन १३५२ मध्ये जलसमाधी घेतली. 
          श्रीपाद श्रीवल्लभांच्या जलसमाधी नंतर एका वल्लमेश नावाच्या ब्राह्मणाने कुरवपूरला जाण्याची आणि नेहमी पेक्षा जास्त नफा झाल्यास १००० ब्राह्मणांना अन्नदान करण्याची शपथ घेतली होती. एकदा कुरवपूरला येत असताना वाटेत काही लुटारूंशी त्यांचा संबंध आला. व त्यांचा शिरच्छेद केला. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले आणि वल्लमेशचे शीर धडास जोडून त्यास जीवनदान दिले. हेच वल्लमेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांच्या पिढीतील नववे वंशज होते.
          ही माहिती अनेक पुस्तके आणि इतर समाजमाध्यमा मार्फत अभ्यास करून तुमच्या पर्यंत पोहोचवली आहे. या घटणां बद्दल किती सत्यता आहे हे इतिहास कारच जाणतात. पुढे आपण नक्की भेटू आणखी एका नविन माहिती सोबत तो पर्यंत मी तुमचा निरोप घेतो, नमस्कार

   ‌‌         श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने