आपल्या घरातील लिव्हिंग रूम कशी असावी?

आपल्या घरातील लिव्हिंग रूम कशी असावी?
          हा जमाना आता फैशनचा आहे. असे म्हणून आपन आपल्या लिव्हिंग रूम मध्ये अनेक बदल करतो. पण आपण हे बदल करताना ते वास्तुशास्त्राच्या नियमांना धरून आहेत का याबद्दलची खातरजमा ही नाही करत. त्यामुळे लिव्हिंग रूम मध्ये अनेक दोष निर्माण होऊन आपलाच मनःस्ताप वाढतो. त्यासाठी लिव्हिंग रूम हे कसे असावे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
* लिव्हिंग रूम कोणत्या दिशेला असावे?
          आपले घर हे जर पुर्व मुखी असेल तर आपल्या घरातील लिव्हिंग रूम ही पुर्वोत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला असायला‌ हवी. आणि आपले घर पश्चिम मुखी असेल तर लिव्हिंग रूम उत्तर -पश्चिम दिशेला असायला‌ हवी. आपले घर हे जर दक्षिण मुखी असेल तर लिव्हिंग रूम मधील बैठक ही दक्षिण-पुर्व दिशेला असायला‌ हवी. 
* लिव्हिंग रूम मधील खिडक्या अशा असाव्यात?
          पुर्व मुखी घरातील लिव्हिंग रूमला खिडक्या या पुर्व दिशेला असलेल्या भिंतीवर असावेत. इथूनच घरात मुबलक सुर्यप्रकाश आणि उर्जा स्त्रोत वाहत राहतो. लिव्हिंग रूम मधील भिंतीना जास्त भडक रंग वापरू नका.शक्य असल्यास भिंतींना सफेद रंग असावा हे सुख आणि शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे रूमचा आकारही मोठा दिसतो. आणि सुर्यप्रकाश परावर्तित होऊन घरात नेहमी उजेड असतो. खिडक्यांना नेहमी भिंतीशी मैचिंग रंगांचे पडदे लावावेत. 
*लिव्हिंग रूम मधील सजावट
          लिव्हिंग रूम मधील भिंतींवर नेहमी हसणार्या, आनंदी आणि सजीव वाटणार्या व्यक्तींची पेंटींग्स लावावीत. नैसर्गिक झाडांची किंवा फुले,पानांची चित्रे रूम मधील वातावरण टवटवीत ठेवते. रूम मध्ये युद्धाची किंवा आक्रामक पेंटिंग कधीच लावू नये. शक्य असल्यास संपुर्ण कुटुंबाचा एकत्रीत फोटो भिंतीवर लावावा.जेणेकरून येणारे पाहुणे तुमच्या कुटुंबा बद्दल चांगले विचार करतील. 
लिव्हिंग रूम मधील सोफा हा कधीच बीमच्या खाली नसावा. वास्तुशास्त्रानुसार जर घरातील लोक जर बीमच्या खाली रहात असतील तर ते नेहमी तनावग्रस्त राहतात. लिव्हिंग रूम मधील टिव्ही हा दक्षिण दिशेला असायला‌ हवा. लिव्हिंग रूम मध्ये ऐक्वेरीयम ठेवायचे असल्यास ते उत्तर दिशेला असावे. आणि याच दिशेला नेहमी ताजी फुले ठेवावीत. 
*दोष निवारण

          लिव्हिंग रूम मध्ये प्रवेश करताच समोर श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असावी. किंवा दरवाजाच्या चौकटीवर श्री गणेशाचे कोरीव काम केलेले असावे. लिव्हिंग रूमच्या मध्य भागी एखादे विंड चाईम असावे. आणि मुख्य म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये वास्तुदोष निवारणासाठी एका पितळेच्या भांड्यात भिमसेनी कापुर ठेवावा. 
अशाप्रकारे आपण वास्तुदोष निवारणासाठी उपाय करू शकतो. आज पुरवते एवढी माहिती तुम्हाला देत आहोत पुन्हा भेटुयात आणखी एक नविन माहिती घेऊन तो पर्यंत सुखी रहा, आनंदी रहा नमस्कार......



थोडे नवीन जरा जुने