श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १८

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १८

          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय अठरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          मागील अध्यायात ग्रंथकाराने श्री स्वामीसुतांच्या जीवन चरित्राचे कथन केले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी सेवेत अर्पण केले. सर्व भारतभर भ्रमण करून श्री स्वामी नामाची पताका स्थापन केली. श्री स्वामींचा संदेश चहूबाजूंना पसरवला. आणि निर्वाण अवस्था प्राप्त करून घेतली. मुंबईची गादी रिकामी झाली. आणि ग्रंथकार पुढील म्हणजेच अठराव्या अध्यायाचे कथन करण्यास सुरुवात करतात. 
          आता स्वामीसुतांच्या गादीवर कोणाला अधिकारी म्हणून नेमावा? या बद्दलचे प्रश्न सेवेकरी श्री स्वामींना विचारु लागले. तेव्हा श्री स्वामी सेवेकर्याना म्हणत, सर्व शिष्य चांगल्या तयारीचे आहेत. पण प्रत्येका मध्ये काही ना काही उणीव आहे. त्यामुळे मुंबईच्या गादीसाठी कोण योग्य आहे या‌बद्दलचे वर्तमान आम्ही आत्ताच सांगणार नाही. जेव्हा आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही स्वामीसुतांच्या गादीवर योग्य अधिकारी नेमू. तो पर्यंत कोणीही कोणतीच काळजी करू नये. 
          श्री स्वामी रात्रंदिवस मोर पांखरा, मोर पांखरा असे म्हणत असत. आणि मोठमोठ्याने ओरडून विचित्र चाळे करत असत. एकदा श्री स्वामी काकुबाईंना म्हणतात, तू आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहेस. तीचा नीट सांभाळ कर. आणि श्री स्वामी अनेकदा जेव्हा जेव्हा काकुबाई दिसतात तेव्हा तेव्हा हेच वाक्य काकुबाईंना म्हणून दाखवतात.
          एकदा श्री स्वामी काकुबाईंना म्हणतात, तू जी आमच्या पायाची वीट लपवून ठेवली आहेस, ती आम्हाला दिली पाहिजे. पण या वाक्याचा अर्थ काकुबाईंना काही समजत नव्हता. तीने अनेक सेवेकर्याना या वाक्याचा अर्थ विचारला, पण कोणीही या वाक्याचा अर्थ लावण्यास समर्थ ठरला नाही. 
          स्वामीसुताचा लहान भाऊ दादा त्यावेळी कोकणात रहात होता. स्वामीसुतांच्या मृत्यूची वार्ता त्यांना समजते. ते शरीराने खुपच सडपातळ होते. आणि अधिकच कृष होत चालले होते. ते चंचल स्वभावाचे असल्यामुळे अज्ञानी होते. काकुबाईंना दादांची खूप काळजी वाटू लागल्याने ते दादांना अक्कलकोटला घेऊन येतात. आणि एक दिवस श्री स्वामींची दादांबरोबर भेट घडवून आणतात. आणि दादांची तब्येत सुधारणा बद्दल प्रश्न करु लागले. 
          तेव्हा श्री स्वामींनी काकुबाईंना आज्ञा केली, की बाळास चांगले आरोग्य प्राप्त होईल. परंतु रोज चार वेळेस याला जेऊ घाल. मनात कोणत्याही प्रकारची चिंता बाळगू नकोस. काकुबाईंनी तसे करताच दादांना चांगले आरोग्य प्राप्त झाले. श्री स्वामींची जेव्हा कृपा होते तेव्हा कोणत्याही प्रकारचे‌ आजार आणि विकार रहात नाहीत.
          नानासाहेब नावाचे, श्री स्वामींचे भक्त केजेगावी मोगलाईत रहात होते. त्यांनी पुष्कळ पैसे खर्च करून श्री स्वामींचा मठ स्थापीला होता. श्री स्वामींच्या पादुका मठात स्थापन करायची आज्ञा त्यांना श्री स्वामींनी एकेकाळी केली होती. त्यासाठी नानासाहेब श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात.
          तेव्हा श्री स्वामी काकुबाईंना म्हणतात, दादाला आमच्या भेटीसाठी इथे आण. पादुका मठात स्थापन करायच्या आहेत. तेव्हा काकुबाई म्हणतात, तो अज्ञान आहे तशात तो शरीराने असमाधानी आहे. मला सांगा त्याची काळजी कोण घेणार. तेव्हा श्री स्वामी म्हणतात, तू पाठवून दे, त्याला आम्ही सांभाळू. तेव्हा काकुबाई म्हणतात, तुम्हाला असे म्हणण्यास जाते काय. यावेळी आम्हाला जे भले वाटते तेच आम्ही करू.
           शेवटी सेवेकर्यां सोबत दादा, मठात पादुका स्थापन करून अक्कलकोटला परत येतात. तेव्हा श्री स्वामी सेवेकर्याना आज्ञा करतात की, दादाला मुंबईच्या गादीवर बसवा. दादाला स्वामींसुताची कफनी, झोळी आणि निशान देऊन गोसावी बनवा. आणि याला स्वामींसुताची गादी चालवण्यास द्यावी.
           काकुबाईंनी या गोष्टींसाठी अनेक प्रकारे विरोध केले. शेवटी ब्रह्मचार्यांनी दादास मुंबईहून अक्कलकोटास पाठवले. तेव्हा श्री स्वामींनी भुजंगास आज्ञा केली की, ह्या माझ्या पादुका घे आणि दादाच्या डोक्यावर ठेव. भुजंगाने तसे केले आणि काय चमत्कार, श्री स्वामींच्या पादुका दादाच्या शीरी पडताच दादाच्या मनास उपरती झाली. सर्व अज्ञान लयास जाऊन हृदयातुन ज्ञानगंगा वाहू लागली. आणि दादा‌ श्री स्वामींस पूर्ण हृदयाने समर्पित झाला. 
          हे पाहून काकुबाई मनात दचकतात. आणि श्री स्वामींना म्हणतात, हे काय विपरीत करता, दादाच्या डोक्यावर पादुका का म्हणून ठेवत अहात? तेव्हा श्री स्वामी म्हणतात, आम्ही योग्य तेच करत आहोत त्यामुळे व्यर्थ बडबड करू नकोस. तेव्हा काकुबाई तिथे आकांडतांडव करतात पण श्री स्वामी तिच्याकडे लक्ष देत नाहीत. 
         दुसऱ्या दिवशी दादाला गोसावी बनवून श्री स्वामी दादास भिक्षा आणण्यासाठी पाठवतात. तेव्हा श्री स्वामी प्रेमाने दादाला जवळ बोलावतात आणि म्हणतात, ही काकुबाई अनुसया माता आहे. सर्वप्रथम तू हिच्याकडे भिक्षा माग. तेव्हा दादा काकुबाईं जवळ येतो. काकुबाईस फार दुःख होते. तेव्हा दादा काकुबाईंस म्हणतात, आजपासुन ही ऐहिक सुखे मला तुच्छ वाटत आहेत. पुत्राचे हे बोलणे ऐकून काकुबाई आणखीनच दु:खि होतात. आणि पुढे दादा स्वामीसुताच्या गादीवर बसून मुंबईची संस्था चालवतात. अशाप्रकारे ग्रंथकाराने दादाच्या चरित्राचे कथन करून या अठराव्या अध्यायाची समाप्ती केली आहे.
    ‌‌ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

थोडे नवीन जरा जुने