श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ६

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय  ६
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सहावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          ज्या प्रमाणे गुरूजन आपल्या बाल शिष्यांना त्यांचे बोट धरून मुळाक्षरे गीरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ माझ्या, मतीमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबुल करीत, मागील अध्यायातील उर्वरित कथेकडे वळतात. 
          श्री स्वामी चोळप्पांना सांगतात की, बडोद्याच्या राजाच्या मनात भक्ती भावच नाही, म्हणून तिथे जाण्याचे आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पांनी तात्यासाहेबांच्या कानावर घातले. हे ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न निष्फळ होतील या भितीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली. आणि गुरूचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बसविले. जेवणावळी उडवल्या आणि दानधर्मही केले. परंतु ही तात्यासाहेबांची दांभिक भक्ती ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 
          दिवसामागून दिवस गेले, कार्य काही यशस्वी होत नाही हे जाणून, तात्यासाहेबांनी एकदा चक्क श्री स्वामींना मेण्यात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र‌ हे लक्षात येताच अर्ध्या रस्त्यात कडपगावच्या ठिकाणी श्री स्वामी मेण्यातून उतरले आणि थेट अक्कलकोटला पोहोचले. असे अनेकदा घडले पण त्याचे प्रतिउत्तरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले. 
          अखेरीस कंटाळून तात्यासाहेब पुन्हा बडोद्यास परतले. हे पाहून मल्हारराव गायकवाडांनी यशवंतराव या मराठा उमरावास अक्कलकोटला पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्र, आभुषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आले. हे पाहताच श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा हा क्रोधावतार पाहून जागीच लटलटा‌ कापू लागला. आणि तेथील कार्य सोडून बडोद्यास परतावे असा यशवंतरावास निरोप आला. 
          याचा परिणाम असा झाला की, मल्हाररावांना आपलं राज्य गमवावे लागले. कोण्या एका साहेबांवर विषप्रयोग करण्याच्या आरोपाखाली मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्री स्वामींच्या अवकृपेचच हे फळ होते. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सहावा समाप्त होतो. 
              श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

          
          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना           
                                                    श्री स्वामी समर्थ||

थोडे नवीन जरा जुने