श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ७

श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय  ७
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सातवा या बद्दल जाणून घेणार आहोत.
           अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांना श्री स्वामीं विषयी विलक्षण भक्ती होती. ते श्री स्वामी सेवा आणि भक्ती करण्यात नेहमी मग्न असत. मालोजी राजे फार धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना आपल्या राजसभेत वेदांत विषयी चर्चा श्रवण करण्याची फार आवड होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरां सारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते. 
          त्या काळी मुंबईत वेदांत विषयावर जाहीर व्याख्यान करणार्या विष्णू बुवा ब्रम्हचारी यांची फारच प्रसिद्धी झाली होती. त्यांनी अनेक परधर्म प्रचारकांना वादविवादा मध्ये हरवून जनमानसात हिंदू धर्मा बद्दल जागृती निर्माण करून नामलौकीक मिळवीला होता. 
          त्यांची किर्ती अक्कलकोट पर्यंत येऊन पोहोचली, तेव्हा मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटला आमंत्रित केले. विष्णु बुवा ब्रम्हचारी अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. विष्णु बुवांची ही अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून राजसभेतील सर्वजण आनंदाने भाराऊन जात. 
          अशातच बुवांना श्री स्वामीं बद्दल कळले. व श्री स्वामींना भेटण्याची त्यांना उत्सुकता जागृत झाली. काही दिवसांनी विष्णु बुवा श्री स्वामींना भेटले. पण विष्णु बुवांच्या मनात हे कोणी भोंदू साधू असावेत अशी भावना उत्पन्न झाली, त्यामुळे विष्णु बुवांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारीत्वा बद्दल विकल्प आला. आणि श्री स्वामींना 'ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय?' असा प्रश्न विचारला. पण श्री स्वामींनी विष्णु बुवांना काहीच उत्तर दिले नाही. आणि विष्णु बुवांकडे पाहून श्री स्वामी फक्त स्मित हास्य करीत राहिले. हे पाहून विष्णु बुवा क्रोधित होऊन तेथून निघून गेले.
          त्याच रात्री बुवांना एक स्वप्न पडले. स्वप्नात असंख्य विंचू विष्णु बुवांच्या अंगावर चढताना दिसले. त्यातून एक महा भयंकर विषारी विंचू दंश करण्यास जवळ येत असल्याचे दृष्य त्यांना दिसले. आणि भयाने त्यांची बोबडी वळली. 
          दुसऱ्या दिवशी विष्णु बुवांनी पुन्हा श्री स्वामींची भेट घेतली, व मागील प्रश्न पुन्हा विचारला. तेव्हा श्री स्वामींनी विष्णु बुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. व म्हणाले "ब्रह्म तदाकार वृत्ती अशी वाटेवर पडली आहे का? 
          श्री स्वामींचे अंतर्ज्ञानीत्व जाणून विष्णु बुवांना पश्चात्ताप झाला. आणि ते श्री स्वामींना शरन गेले. अभिमानातून मुक्त झालेले विष्णु बुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदास योग्य झाले. व श्री स्वामींचे मोठे भक्त झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या सातव्या अध्यायाची समाप्ती होते. 
            श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

          
          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना 
 श्री स्वामी समर्थ||

थोडे नवीन जरा जुने