श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ११

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ११
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय अकरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          मागील अध्यायात ग्रंथ कर्त्याने बाळप्पा हे मुरगोड गावी आल्याचे वर्तमान कथन केले आहे. तेथेच होऊन गेलेल्या, चिदंबर दिक्षित नावाच्या सत्पुरुषाच्या कार्याचे कथन‌ही ग्रंथ कर्त्याने केले आहे. 
          सर्वप्रथम मुरगोड गावातच बाळप्पाना श्री स्वामीं विषयी माहिती समजली. परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटला जाण्या ऐवजी श्री दत्त क्षेत्री म्हणजेच गाणगापूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळप्पा गाणगापूर येथे दाखल झाले.
           गाणगापूरात बरेचसे भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असत. कुणी संततीसाठी तर कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी भक्तजन गाणगापूरात दाखल होत असत. बाळप्पा मात्र सद्गुरूचा ध्यास घेऊन गाणगापूरात दाखल झाले. 
           गाणगापूरात पोहोचल्यावर बाळप्पांनी स्वतःला दत्त सेवेत झोकून दिले. बाळप्पा नित्य स्नान, मध्यान्ह स्नान, संध्या वंदन करुन नित्य नियमाने जपध्यान व नामस्मरण करीत आपला दिनक्रम चालवू लागले. आणि माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले. 
          पुढे काही महिन्यांनी स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात तीन यतीमुर्ती समोर येऊन उभ्या ठाकल्या. आणखी पुढे पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात एका ब्राह्मणाने दर्शन दिले. व अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी सेवा करा असे सांगितले. 
          मध्यान्ह स्नान आटोपते वेळी वस्त्रा खाली बाळप्पांना एक विंचू दिसला. पण त्याला न मारता तसेच सोडून दिले. आणि मंदिरात परतताना त्यांना अनेक शुभ संकेत प्राप्त झाले. व माधुकरीत त्यांना मिष्ठान्न खायला मिळाले. अक्कलकोटला जाण्यास हाच दिवस शुभ मानून, बाळप्पा अक्कलकोटला निघाले. पुढे त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वतःला श्री स्वामी सेवेत झोकून दिले. त्यांच्या पुर्व पुण्याई मुळेच बाळप्पांना श्री स्वामींचा अनेक वर्षे सहवास लाभला. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या अकराव्या अध्यायाची समाप्ती होते.

               श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

         
         थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
थोडे नवीन जरा जुने