श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ३

     श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ३
            

           श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

          अपना सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार, आपन मागील अध्यायात पाहीले की, कलकत्त्याहून आलेल्या साहेबाला आपण कुठुन आलो यांचे उत्तर दिले, व श्री स्वामींनी स्वतः विषयी सांगितले. व स्वामींच्या मंगळवेढा येथील कथन आलेले आहे. 
          आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट आगमना विषयी वृत्तांत सांगितला आहे. मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपुर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापूरात येऊन पोहोचले. अक्कलकोटात प्रवेशाला सुरूवात करताना स्वामींचे परमभक्त चींतोपंत टोळ सोबत होते. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेतून माघारी परतावे लागल्यामुळे, श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. 
           अक्कलकोट येथे येताच क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविंधाला चमत्कार दाखविला, आणि पुढे चोळप्पाच्या घरी स्वामींनी आपला मुक्काम केला. तेव्हा पुर्व पुण्याईच्या योगाने चोळप्पाच्या घरी श्री स्वामी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे‌ योगतत्व नसुनही केवळ भक्तीबळाचे सामर्थ्य बाळगणार्या भक्तांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. 
          चोळप्पाच्या घरात वास्तव्य करणार्या श्री स्वामींची किर्ती जेंव्हा अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजींच्या कानी पोहोचली तेव्हा श्री स्वामींचे दर्शन कसे घडेल या उत्सुकते मध्ये असताना स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात स्वामींना समोर उभं पाहून राज्यसभेतील सर्वजण चकित झाले. तसेच राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चर्चांना मिठीच घातली. 
          भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकी धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात तिथे राजांचे काय कौतुक, आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या तिसऱ्या अध्यायाची समाप्ती होते. 
           श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

           

     ‌‌ थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
थोडे नवीन जरा जुने